उत्तर मिळालं! बाहुबली-२चा ‘तो’ सीन लीक

20

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कटप्पाने बाहुबलीला का मारलं? या प्रश्नाचं उत्तर दोन वर्षांनंतर आज अखेर प्रेक्षकांना मिळणार आहे. बहुचर्चित बाहुबली-२ सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. मात्र काही क्षणातच सिनेमाचा काही भाग इंटरनेटवर लीक झाल्याची चर्चा आहे.

इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहुबली-२ चा एक सीन इंटरनेटवर लीक झाला आहे. यामध्ये शिवागामी आपल्या कटप्पाशी संवाद साधत असल्याचे दिसते. त्यामुळे कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर मिळतं, असं सांगितलं जात आहे. मात्र व्हायरल झालेला सीन डब असून त्यातील संवाद खोटा असल्याचंही सांगण्यात येत आहे. तसेच युट्युबवरून बाहुबली-२ लीक या नावाने अपलोड करण्यात आलेले बरेचसे व्हिडिओ काढण्यात आले आहेत. या व्हिडिओला काही मिनिटांत लाखो हिट्स मिळाल्याचंही सांगण्य़ात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या