ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी तीन दिवसांपासून सुरू असलेले आत्मक्लेश उपोषण मागे घेतले आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पैशांच्या प्रचंड वापराविरोधात त्यांनी उपोषण सुरू केले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते त्यांनी पाणी घेत उपोषण मागे घेतले. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने हे आंदोलन राज्यभर न्यावे, अशी अपेक्षाही आढाव यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी उपस्थित होते.
बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी घेत उपोषण मागे घेतले #uddhavthackeray #sanjayraut #shivsenaubt #saamanaonline pic.twitter.com/qkMLTchynL
— Saamana Online (@SaamanaOnline) November 30, 2024