फार्म हाऊसमध्ये म्हणे फक्त पाळीव गुरे

28

सामना ऑनलाईन। खालापूर

बलात्कारी बाबा राम रहिम याचा खालापुरातील कलोते गावातही ३३ एकर इतक्या प्रशस्त जमिनीवर भव्य आश्रम असून या आश्रमाच्या डेरालाही रॅपिड ऍक्शन फोर्सने  घेरा घातला आहे. या आश्रमात गेल्या दोन वर्षांपासून राम रहिम फिरकलेला नसून येथे फक्त पाळीव गुरेच बांधली आहेत असे सांगण्यात आले.

खालापुरातील मुंबई-पुणे जुन्या महामार्गालगत कलोते गावात राम रहिमचा डेरा सच्चा सौदा या नावाने आश्रम आहे. राम रहिमला अटक झाल्यानंतर या आश्रमाला रॅपिड ऍक्शन फोर्सच्या ४० जवानांनी आणि पोलिसांनी घेरा घातला आहे. या आश्रमात बांधण्यात आलेल्या पाळीव गुरांची सेवा करण्यासाठी काही सेवेकरी नेमण्यात आले आहेत. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ए.वाय. शेख यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या