राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हत्या करण्यात आली. मरीन लाईन्समधील बडा कब्रस्थानमध्ये आज रात्री 8.30 वाजता बाबा सिद्दीकी यांचा दफनविधी होणार आहे. शासकीय इतमामात सिद्दीकी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मुस्लिम धर्मानुसार नमाज-ए-जनाजा सिद्दीकी यांच्या राहत्या घरी मकबा हाईट येथे करण्यात आला.
दीड महिना रेकी केल्यानंतर शनिवारी तीन हल्लेखोरांनी आपला प्लान यशस्वी केला. तर चौथा आरोपी या तिघांना मार्गदर्शन करत असल्याचे तपासात समोर आले आहे. दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.