‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधून बबिता बाहेर? वाचा काय आहे खरं…

छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेला तारक मेहता का उल्टा चश्मा हा कार्यक्रम सध्या बराच चर्चेत आहे. कारण, या कार्यक्रमाचा एक मुख्य भाग असलेली बबिता जी अर्थात मुनमुन दत्ता हिने हा शो सोडल्याची चर्चा रंगली आहे.

गेल्या काही भागांपासून मुनमुन या कार्यक्रमात दिसलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने लाईव्ह व्हिडीओमध्ये केलेल्या जातिवाचक उल्लेखामुळे ती खूप ट्रोल झाली होती. त्यानंतर तिचा शोमधला वावरही कमी झाला होता.

पण गेल्या काही भागांमध्ये ती दिसलेली नाही. त्यामुळे तिने हा शो सोडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. बबिता या तिच्या व्यक्तिरेखेने खूप लोकप्रियता मिळवली आहे. तिचा स्वतःचा असा स्वतंत्र चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिने खरोखर हा शो सोडला का, याबाबत विचारणा होत आहे.

तर, याचं उत्तर नाही, असं असल्याची माहिती मिळत आहे. सध्या जे भाग दाखवले जात आहेत, ते दमण येथे चित्रित झालेले आहेत. राज्यात कोविडच्या वाढत्या प्रकोपामुळे काही काळापूर्वी चित्रीकरणं राज्याबाहेर होत होती. त्या चित्रीकरणांमध्ये मुनमुन सहभागी होऊ शकली नव्हती. त्यामुळे ती या भागांमध्ये दिसलेली नाही.

आता पुन्हा मूळ जागी चित्रीकरण सुरू झाल्यामुळे पुढील काही भागांत ती पुन्हा दिसेल, अशी माहिती मिळत आहे. या शोचे निर्माते असित मोदी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत याची पुष्टी केली आहे. तिची शोमधून एक्झिट झाल्याच्या निव्वळ अफवा असून ती कायम या शोचा एक भाग असेल, असं मोदी यांनी स्पष्ट केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या