बबिता फोगाट होणार आई, नवऱ्याच्या वाढदिवशी शेअर केले स्पेशल फोटो

हिंदुस्थानची दंगल गर्ल बबीता फोगाट तिच्या घरी लवकरच एक नवीन पाहुणा येणार आहे. बबिता गरोदर असून तिने सोशल मीडिया वरून तिच्या प्रेग्नेंसी ची न्यूज दिली बबीता ने पती बेबी बम सोबत फोटो देखील शेअर केली आहेत

कॉमनवेल्थ मध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या बबिताचे गेल्यावर्षी  विवेक सुहाग याच्यासोबत लग्न झाले होते विवेक हादेखील कुस्तीपटू असून त्यांनी भारत केसरी हा किताब जिंकलेला आहे सध्या तो भारतीय रेल्वे मध्ये कामाला आहे. बबिता आणि विवेक एकमेकांना सहा वर्षांपासून ओळखतात. दोघांची भेट दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी आपापल्या कुटुंबीयांना आपल्या नात्याविषयी कल्पना दिली. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी जून महिन्यात त्यांचा विवाह निश्चित केलेला.

डिसेंबर महिन्हयात हरयाणातील बलाली या गावी बबिता आणि विवेक यांचा विवाह सोहळा पार पडला. हा विवाह पारंपरिक पद्धतीने आणि अतिशय साधेपणाने पार पडला. या लग्नात फक्त 21 वऱ्हाडी उपस्थित होते. विशेष म्हणजे, इतर वेळी लग्नात सात फेरे घेतले जातात, मात्र इथे या दोघांनी आठ फेरे घेऊन आठव्या फेरा घेताना बेटी बचाओ-बेटी पढाओचा संदेश दिला. हा विवाह खासगीत झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या