ओवैसी म्हणजे दुसरा झाकीर नाईक, भाजप खासदाराची टीका

1070

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी शनिवारी एमआयएमचे प्रमुख असदुद्दिन ओवैसी यांच्यावर टीका करत त्यांना फटकारले आहे. सुप्रियो यांनी ओवैसीची तुलना वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक व मनी लॉण्डरिंग प्रकरणी फरार असलेल्या झाकीर नाईकसोबत केली आहे. या टीकेमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘ओवैसी जे आहेत ते दुसरे झाकीर नाईक बनत आहेत. जास्त बोलतील तर आमच्या देशात कायदा आहे. जास्त काही बोलले तर बघून घेतलं जाईल’, अशा शब्दात बाबुल सुप्रियो यांनी ओवैसी यांना फटकारले आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी अयोध्येबाबत झालेला निकाल त्यांना मान्य नसल्याचे सांगितले आहे. तसेच शुक्रवारी त्यांनी त्याच वादग्रस्त ठिकाणी मशिदी हवी अशी मागणी देखील केली आहे. त्यांच्या या मागणीवरून केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी त्यांना फटकारले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या