चट्टेरी-पट्टेरी चड्ड्या 15 हजार रुपयांना, किंमत पाहून लोकं खुळे झाले

लॉकडाऊनच्या काळामध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ असल्याने शॉर्टस आणि पायजमाला सुकाळ आला होता. जीन्स आणि इतर कपडे तर फक्त कपाटामध्ये शोभेसारखे पडून होते. अर्थात आता लॉकडाऊन संपला असला तरी नोकरवर्ग शॉर्टस आणि पायजमाला विसरलेला नाही. कम्फर्टसाठी शॉर्टस किंवा पायजमा आजही बेस्ट आहे.

गावाकडे आजही पायजमा, नेहरू, कोपरी (बनियान) आणि चट्टेरी-पट्टेरी रंगाच्या चड्ड्या अर्थात अंतर्वस्त्र घातली जातात. शेतामध्ये काम करताना ही वस्त्र सुटसुटीतपणा देतात. त्यामुळे याला मोठी मागणीही असते. ‘हेरा फेरी’ चित्रपटामध्ये बाबूराव अर्थात परेश रावल यांना तुम्ही देशी अंतर्वस्त्रामध्ये पाहिले असेलच. कापडापासून बनवण्यात आलेल्या या चट्टेरी-पट्टेरी चड्ड्यांची किंमत 100 ते 150 रुपयांपर्यंत असते. परंतु एक कंपनी सध्या याच चड्ड्या तब्बल हजारोंना विकत आहे.

15 हजार में बाबू भैया का कच्छा...

सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. यात चट्टेरी-पट्टेरी चड्ड्यांची किंमत तब्बल 15 हजार 450 रुपये असल्याचे दिसते. ही किंमत बघून लोकं खुळी झाली आहेत. नेटकऱ्यांनी यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मेरे दादा पहनते थे ऐसे कच्छे

एका युजरने माझे आजोबा अशा चड्ड्या घालत होते अशी आठवण सांगितली.

मतलब, कुछ भी...

तर काहींनी दादा कोंडके यांचीही आठवण काढत या चड्ड्या एवढ्या महाग का? असा सवाल केला आहे.

कोई बताएगा क्यों इतना महंगा है ये?