चार दिवस दारूची पार्टी करण्यात मश्गुल झाली आई, मुलाचा भुकेने मृत्यू

फोटो प्रातिनिधिक

या जगात आईसोबतचं नातं हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी आणि भल्यासाठी ती कोणतंही बलिदान देऊ शकते. पण, या जगात अशाही माता आहेत, ज्यांनी या नात्याची जाण ठेवलेली नाही आणि त्याची किंमत त्यांच्या मुलांना चुकवावी लागते. असाच काहीसा प्रकार एका लहानग्याच्या जिवावर बेतला आहे.

ही घटना रशियाच्या झ्लाटौस्ट शहरातील एका महिलेसोबत घडली आहे. ओल्गा बझारोवा असं या महिलेचं नाव आहे. तिला तीन मुलं असून तिचे दोन विवाह झाले आहेत. पहिल्या विवाहापासून तिला सात वर्षांचा एक मुलगा असून दुसऱ्या विवाहापासून तिला तीन वर्षांची एक मुलगी आणि 11 महिन्यांचा एक मुलगा आहे.

दुसऱ्या विवाहात समस्या झाल्याने ती आपल्या मुलांसह वेगळी राहते. तिने मित्रांसोबत दारू पार्टी करण्याचा बेत आखला होता. त्यासाठी तिने मोठ्या मुलाला एका मित्राच्या घरी सोडलं. पण, लहान मुलांना सांभाळण्यासाठी तिला कुणीही मिळालं नाही. त्यामुळे तिने तिच्या सासूला मुलांकडे लक्ष ठेवायला सांगितलं आणि ती पार्टी करायला निघून गेली.

चार दिवसांनी जेव्हा ओल्गाची सासू तिच्या घरी गेली तेव्हा तिला एक भयानक दृश्य दिसलं. तिची लहान मुलगी बेशुद्धावस्थेत पडली होती. तर तिचा 11 महिन्यांचा लहान मुलगा तहान भुकेने गतप्राण झाला होता. ओल्गाने त्यांना खाण्यासाठी काहीही ठेवलं नव्हतं. फ्रीजही रिकामा होता.

सासूने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केलं आणि ओल्गाला अटक केली. या प्रकरणी ओल्गाला न्यायालयाने 14 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या