साराचा सैफसोबतचा चित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमध्ये सध्या पाय रोवत असलेली अभिनेत्री सारा अली खान हिचे सुरुवातीचेच दोन चित्रपट हिट ठरल्यामुळे सध्या ती फॉर्मात आहे. साराच्या चाहत्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. सध्या साराचा तिचे वडिल अभिनेता सैफ अली खानसोबतचा एक व्हिडीओ शेअर होत आहे. हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत सारा अवघी तीन ते चार वर्षांची असून ती चित्रपटाच्या सेटवर सैफसोबत मस्ती करताना दिसत आहे. केसांचे दोन झेंडू बांधलेली चिमुरडी सारा ही अत्यंत क्यूट दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. रविवारी फादर्स डेच्या दिवशी साराचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.