पाळणाघरांचा आधार

258

मुंबईतल्या अनेक मतदारसंघांत पाळणाघरे तयार केली होती. बाळांना पाळणाघरांत ठेवून मतदानासाठी महिला रांगेत निर्धास्तपणे उभ्या राहिलेल्या दिसल्या.

वरळी सी फेसवरील मतदान केंद्रात मतदानासाठी आलेल्या शिवांगी पाटील म्हणाल्या की, मी माझ्या चार वर्षांच्या वैष्णवीला मतदानासाठी घेऊन आले, पण मतदानासाठी रांग होती. त्यामुळे वैष्णवीला मतदान केंद्रातील पाळणाघरात ठेवले. पाळणाघरात खेळणी होती व इतर बालकेही होती. माझी मुलगी पाळणाघरात खेळणी व बालकांबरोबर खेळण्यात रमली होती त्यावेळेत मी मतदानाचा हक्क बजावला असे त्या म्हणाल्या. अशाच प्रकारचे पाळणाघर शिवडीतल्या मतदार केंद्रावर तयार करण्यात आले होते. सहा वर्षांची श्रेया पाटील या पाळणाघरात होती. श्रेया तिच्या आजी-आजोबांसोबत मतदान केंद्रावर आली होती. आजी-आजोबा मतदान केंद्रात गेले तेव्हा श्रेया पाळणाघरात खेळत होती. आम्हाला मज्जा आली असे ती सांगत होती.

आपली प्रतिक्रिया द्या