बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी, जामीन अर्ज फेटाळला

आमदार बच्चू कडू यांचा जामीन अर्ज गिरगाव न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाने बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राजकीय आंदोलनाप्रकरणी कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने बच्चू कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावला होता. बच्चू कडू आज न्यायालयासमोर हजर झाले असता त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. जामीन अर्ज फेटाळल्याने आणि बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.