बीडचे राष्ट्रवादीचे बदामराव पंडित शिवसेनेत     

55

सामना ऑनलाईन । मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बीडमधील जिल्हा परीषद, पंचायत समिती सदस्य, बाजार समिती संचालक, खरेदी विक्री संचालक, सरपंच, सेवा सोसायटी चेअरमन यांनीही बदामराव पंडित यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादीला बीड जिल्यात चांगलाच फटका बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून आपली गळचेपी होत असल्याचे या पक्ष प्रवेशा वेळी बदामराव पंडित यांनी सांगितले. वेळी शिवेसेनेत प्रवेश करण्यासाठी आलेल्या सर्वांशी उद्धव ठाकरे यांनी सवांद साधला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करावे यासाठी शिवसेनेने पहिल्यांदा आवाज उठवला. मराठवाड्यात जेंव्हा मेळावा घ्यायचं ठरलं त्या वेळेस बीड शिवाय जागा नाही असं हि एकमताने ठरलं. त्यानंतर सगळ्यात मोठा मेळावा बीड मध्ये घेण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या