बदलापूर (ठाणे) येथील चार वर्षांच्या दोन चिमुरड्या बालिकांवर शाळेतील एका सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने केलेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध करून त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज बुधवार दि.21 ऑगस्ट 2024 रोजी मेहकर तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार निलेश मडके यांना निवेदन देऊन तहसील कार्यालयासमोर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
यापुढे महिला भगिनी व विद्यार्थिनींवर कोणतेही अत्याचार होऊ नयेत, त्यांना सुरक्षितता मिळावी गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण व्हावा आणि असे कृत्य करणाऱ्या नराधमांना धडा मिळावा यासाठी या नराधमाना त्वरीत फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तसेच या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध व्यक्त केला.
यावेळी आशिष रहाटे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), निंबाजी पांडव (तालुका प्रमुख), किशोर गारोळे (शहरप्रमुख), ॲड आकाश घोडे (युवासेना तालुका प्रमुख) ॲड संदिप गवई, ऋषीकेश जगताप (युवासेना शहर प्रमुख),उप तालुका प्रमुख रमेश बाप्पु देशमुख, श्याम पाटिल निकम,साहेबराव हिवाळे, परसराम पाटिल, संदिप गारोळे,अमोल बोरे, रफिक गवळी,गणेश गावंडे, प्रकाश मानवतकर, गजानन जाधव, शुभम पानखेडे, अमोल मोरे, जगन्नाथ घाटोळ,छगन सांगोळे, रोहन जाधव, भरत चेके,अशोक सवडतकर, शेख खलिल, आश्विन साबळे, हर्षल देशमुख, तसेच मेहकर तालुक्यातील व शहरातीलअसंख्य (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसैनिक हजर होते.