आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीच्या कुटुंबीयांचा सत्कार

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेला बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी यांच्या कुटुंबियांचा सोमवारी सत्कार करण्यात आला.

बॅडमिंटनमधील पुरुषांच्या दुहेरी प्रकारात सहभागी होत असलेला चिराग शेट्टी हा मुंबई उपनगर जिह्यातील खेळाडू होय. चिराग शेट्टीचे मनोधैर्य उंचावण्यासाठी पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वडील चंद्रशेखर शेट्टी, काका चंद्रेश, भाऊ शशांक या त्याच्या कुटुंबियांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के या मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑलिम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात येणाऱया सेल्फी पॉइंटचेही उद्घाटन करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या