फॅशनेबल बॅग्ज

पूजा तावरे, फॅशन डिझायनर

बॅगांमध्ये नेहमीच वेगवेगळे ट्रेंड येत असतात. स्लिक, स्टायलिश आणि फॅशनेबल असणाऱ्या बॅगा सध्या आजच्या तरुणींमध्ये चांगल्याच लोकप्रिय ठरल्या आहेत.

चांगले आणि फॅशनेबल कपडे घातले म्हणजे फॅशन परिपूर्ण होत नाही हं…. कपडय़ांइतकीच ऍक्सेसरीज ही महत्त्वाची असते. सुंदर अशा ड्रेसवर ज्वेलरी, मेकअप इत्यादी गोष्टींइतकीच महत्त्वाची वाटू लागलीय बॅग. बॅग एका नव्या रूपात आणि नव्या ढंगात आपल्या आजूबाजूला दिसू लागल्यात. सध्या बॅग म्हणजे स्टेटस सिम्बॉल बनली आहे. बॅगमध्ये वाईड चॉईस असल्याने बाजारात बॅग घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. ड्रेसबरोबरच बॅगची फॅशनदेखील बदलत चालली आहे. त्यामुळे बाजारात विविध प्रकारच्या बॅगा पाहायला मिळतात. आजकाल तरुणी आपल्या ड्रेसबरोबरच बॅगेच्या फॅशनकडेदेखील लक्ष देऊ लागल्या आहेत. बाजारात छोटय़ा-मोठय़ा आकाराच्या बॅगा दिसून येत आहेत. तसेच सध्या बॅगा विविध रंग, पॅटर्न, डिझाइन्स, फॅब्रिकमध्ये उपलब्ध आहेत.

बॅगांमध्ये नेहमीच वेगवेगळे ट्रेंड येत असतात. स्लिक, स्टायलिश आणि फॅशनेबल असणाऱ्या बॅगा सध्या आजच्या तरुणींमध्ये चांगल्याच लोकप्रिय ठरल्या आहेत.

क्रॉस बॉडी बॅग

आजकाल क्रॉस शोल्डर बॅग खास ट्रेंडमध्ये आहे. जेव्हा पण आपण हातात काहीही न पकडता बिनधास्त फिरायचा विचार करत असाल तर या प्रकारची बॅग एकदम उत्तम चॉईस आहे. सध्या क्रॉस बॉडी बॅगेला तरुणींमध्ये अधिक पसंती दिसून येत आहे. ही बॅग कमरेच्या भोवती सहजरीत्या अडकवता येत असल्यामुळे आणि आकारानेही सोयिस्कर असल्यामुळे अधिक मागणी दिसून येत आहे. क्रॉस बॉडी बॅगा विविध आकारामध्ये आणि अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

विविध आकारप्रकार

छोटय़ा हॅण्डलच्या मोठय़ा पर्सेस (सॅटचेल्स), मोठय़ा झोळी पर्सेस, क्लचेस, गोल आकारात अनेक पर्सेस उपलब्ध आहेत. अंडाकृती आडव्या पर्स आणि त्यावर स्कार्फ अडकवायची स्टाइल अजूनही ‘इन’ आहे. हॅण्ड पर्स, लॉंग-बेल्टेड पर्समध्येदेखील गोंडय़ांची फॅशन सध्या इन आहे. हॅण्डमेड बॅग, शबनममध्येदेखील गोंडयांचे आकर्षक नक्षीकाम केलेले पाहायला मिळते. लेदरपासून बनलेल्या टोट बॅग्ज पार्टीला जाताना साडी किंवा वेस्टर्न वेअरवर चांगल्या दिसतात.

स्लिंग बॅग

स्लिंग बॅग ही प्रत्येक आऊटफिटवर अगदी परफेक्ट शोभून दिसणारी आहे. मेटल चेन्स, नियॉन कलर्स, डेकोरेटिव्हन यामुळे या बॅगा तरुणींमध्ये लोकप्रिय आहेत.

ओव्हरसाईज्ड बॅग

दैनंदिन वापरासाठी ओव्हरसाईज्ड बॅग ही अतिशय योग्य आहे. आकाराने मोठी असल्यामुळे ट्रव्हलिंगसाठी, वर्किंग वुमन्ससाठी अतिशय सोयिस्कर आहे.

डफल किंवा गीअर बॅग

डफल बॅग किंवा गिअर बॅगमध्येही अनेक प्रकार आहेत. या बॅगा साधारण दंडगोल आकाराच्या आणि बऱ्यापैकी लांब असतात. हातात पकडायला एक हँडल तर दुसरे खांद्यावर अडकविण्यासाठी असते.बाजूला अधिक कप्पे असल्याने कॉलेज विश्वात या डफल बॅगेला अधिक मागणी आहे. या प्रकारात एक्स्पांडेबल डबल बॅगाही आहेत.

शायनी स्टडेड बॅग

लग्नानंतर समारंभ, पार्टीसाठी शायनी स्टडेड बॅगला पसंती मिळत आहे. क्रिस्टल किंवा डायमंडने सजविलेल्या बॅगमध्ये उपलब्ध आहेत. या बॅग लुकसाठी शायनी आणि स्टायलिश असतात. त्यामुळे लग्नसमारंभ, पार्टीसाठी या अतिशय योग्य असून या तुम्हाला डिफरंट लुक देतात.

आपली प्रतिक्रिया द्या