थुकरटवाडीत येणार ‘भाऊबली’

115

 सामना ऑनलाईन, मुंबई

‘चला  हवा येऊ द्या’च्या मंचावर आजवर ‘माहेरची साडी’ पासून ते ‘सैराट’पर्यंत आणि हिंदीतील ‘तिरंगा’पासून आजच्या ‘दंगल’पर्यंत अनेक चित्रपटांची थुकरटवाडीकरांची खास आवृत्ती बघायला मिळाली आहे आणि आता या मंचावर चक्क ‘बाहुबली-२’ या चित्रपटाचे मराठमोळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

chala-hawa-yeu-dya-bahubali

हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीत कमाईचे सारे रेकॉर्ड तोडणाऱया  ‘बाहुबली २’ ची ही लोकप्रियता बघता थुकरटवाडीकरांनीही मग प्रेरणा घेत ‘भाऊबली’ हा चित्रपट बनवला. ज्यात भाऊबलीच्या मुख्य भूमिकेत भाऊ कदम, देवसेनेच्या भूमिकेत श्रेया बुगडे, भल्लालदेवच्या भूमिकेत अंकुर, शिवगामीच्या भूमिकेत सागर कारंडे, बिज्जलदेवच्या भूमिकेत भारत गणेशपुरे आणि कटप्पाच्या भूमिकेत कुशल बद्रिके बघायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे चित्रपटात ज्याप्रमाणे स्पेशल इफेक्ट्सचा खास वापर करण्यात आलाय तसाच वापर इथेही दिसणार आहे. येत्या सोमवारी हा विशेष भाग पाहायला मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या