अबब.. बाहुबली-२चा विमा २०० कोटींचा

सामना ऑनलाईन । मुंबई
बहुचर्चित बाहुबली-२ चित्रपट दररोज नव्या विक्रमांची नोंद करत आहे. विमा उतरवण्याच्या बाबतीतही हा चित्रपट बाहुबली ठरला आहे. बाहुबली-२ या चित्रपटासाठी निर्मात्याने जनरल इन्शुरन्स कंपनीकडून २०० कोटी रुपयांचा विमा घेतला होता. विम्यामुळे चित्रपट निर्मितीची तयारी सुरू असल्यापासून ते चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत बाहुबली-२ला संरक्षण मिळाले.
चित्रपटाच्या निर्मितीवेळी मृत्यू, आजारपण, नैसर्गिक आपत्ती किंवा अपघात अशी एखादी अनुचित घटना घडली असती, निर्मिती प्रक्रियेत विलंब झाला असता तर विम्यामुळे निर्मात्याला भरपाई मिळाली असती. चित्रीकरण सुरू असताना तांत्रिक किंवा अन्य कारणाने नुकसान झाले असते तर त्याचीही भरपाई विम्यामुळे मिळणार होती.
जनरल इन्शुरन्स कंपनीने आतापर्यंत बॉलिवूडच्या १६० तर संपूर्ण देशभरात तब्बल ३७२ चित्रपटांना विमा संरक्षण दिले आहे.
आपली प्रतिक्रिया द्या