Bajaj, Glamour की CB Shine! कोण देतं सर्वाधिक मायलेज? वाचा…

4360
नवीन बाईक घेण्याचा विचार करत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला 125 सेगमेंटमधील बजाज, हीरो आणि होंडा या तीन बाईकविषयी सांगणार आहोत. या तिन्ही बाईकची प्रारंभिक किंमत ही 70,000 रुपयांपेक्षा कमी आहे. या बाइक्समध्ये तुम्हाला प्रति लिटर 60 किलोमीटरपेक्षा जास्त मायलेज मिळेल. आज आम्ही तुम्हाला या बाइक्सची किंमत, परफॉर्मन्स आणि मायलेजबद्दल सांगणार आहोत.

bajaj-discover-price

Bajaj Discover 125
  • परफॉर्मन्स – Bajaj Discover 125 मध्ये 124.6 सीसी 4 स्ट्रोक, एअर कूल्ड सिंगल सिलिंडर, एसओएचसी, डीटीएस-आय इंजिन आहे. जे 7500 आरपीएम वर जास्तीत जास्त 11 पीएस पॉवर आणि 5500 आरपीएम वर 11 एनएमची पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकचे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.
  • किंमत – Discover 125 CBS च्या ड्रम व्हेरिएंटची एक्स-शोरूम  किंमत 58,752 रुपये आहे. तर याच्या डिस्क व्हेरिएंटची किंमत 62,253 रुपये आहे.
  • मायलेज – ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) च्या मते Discover 125 एक लीटरमध्ये 66.7 किलोमीटरचे मायलेज देते.

 

hero-glamour-125

Hero Glamour
  • परफॉर्मन्स – New Hero Glamour 124.7 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. जे 7500 आरपीएम 11.6 पीएची मॅक्सिमम पॉवर आणि 6500 आरपीएम वर 11 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकचे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.
  • किंमत – New Hero Glamour च्या ड्रम व्हेरिएंटची एक्स-शोरूम  किंमत 62,250 रुपये आहे. तर याच्या डिस्क व्हेरिएंटची किंमत  65,750 रुपये आहे. तसेच याच्या एफआय व्हॅरिएंटची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 69,950 रुपये आहे.
  • मायलेज – एआरएआयच्या मते New Hero Glamour एक लीटर मध्ये 62.2 किलोमीटरचे मायलेज देते.

 

honda-cb-shine

Honda CB Shine
  • परफॉर्मन्स – Honda CB Shin च्या परफॉर्मन्सविषयी बोलायचे झाले तर या बाईकमध्ये 124.7 सीसी इंजिन देण्यात आले आहे. जे 7500 आरपीएम 10.3 पीएची मॅक्सिमम पॉवर आणि 5500 आरपीएम वर 10.3 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकचे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.
  • किंमत – Honda CB Shine च्या ड्रम व्हेरिएंटची एक्स-शोरूम  किंमत 58,967 रुपये आहे. तर याच्या डिस्क व्हेरिएंटची किंमत 63,627 रुपये आहे.
  • मायलेज – एआरएआयच्या मते Honda CB Shine एक लीटर मध्ये 64.6 किलोमीटरचे मायलेज देते.

आपली प्रतिक्रिया द्या