प्रवास होणार आरामदायक, Bajaj Platina 100 ES झाली लॉन्च; किंमत…

देशातील आघाडीची दुचाकी निर्माता कंपनी बजाज ऑटो (Bajaj Auto) ने Platina 100 चा ES व्हेरिएन्ट हिंदुस्थानमध्ये लॉन्च केले आहे. Platina 100 Electric Start मध्ये स्प्रिंग-इन-स्प्रिंग सस्पेन्शन देण्यात आले आहे, यामुळे दुरचा आणि ओबड-धोबड रस्त्यावरील प्रवासही आरामशीर होणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

फिचर्स

– स्प्रिंग-इन-स्प्रिंग सस्पेन्शन
– ट्यूबलेस टायर्स
– एलईडी DRL हेडलॅप आणि रबर फुटपॅड्स

bajaj-platina-100-es-new

Platina 100 Electric Start मध्ये 102 सीसीचे 4 स्ट्रोक, सिंगल सिलिंडर, डीटीएस-आय इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7500 आरपीएमवरप 7.9 PS ची पॉवर आणि 5500 आरपीएम पर 8.3 Nm चा टॉर्क जनरेट करते. तसेच Platina 110 H-Gear चे इंजिन 4-स्पीड गियरबॉक्स ट्रांसमिशनयुक्त आहे.

bajaj-platina-100

किंमत

Bajaj Platina 100 च्या ES DRUM व्हेरिएन्टची दिल्लीमध्ये एक्स शोरूम किंमत 59 हजार 829 आहे, तर 100 ES DISC व्हेरिएन्टची किंमत 63 हजार 578 रुपये एवडी आहे. तसेच 100 KS व्हेरिएन्टची किंतम 52 हाजर 915 रुपये आहे.

आपली प्रतिक्रिया द्या