
रविवारी नव्या संसदेचे लोकार्पण होत असताना दुसरीकडे आंदोलनकर्त्या पैलवानांवर पोलिसांचा दंडुका चालवण्यात आला. देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंविरुद्ध झालेल्या या दंडुकेशाहीविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली. या दरम्यान, या खेळाडूंचा एक फोटो व्हायरल झाला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ते हसताना दिसत आहेत. पण, हा फोटो खोटा असून आयटीसेलने जाणूनबुजून व्हायरल केल्याचा गंभीर आरोप बजरंग पूनियाने केला आहे.
रविवारी नव्या संसदेकडे जाणआऱ्या कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडण्यासाठी बळाचा वापर करून त्यांना अक्षरशः फरफटत नेण्यात आलं. बजरंग पुनिया, विनेश फोगाट तसेच साक्षी मलिकला पोलिसांनी व्हॅनमध्ये डांबलं. या सगळ्या कारवाईदरम्यान कुस्तिपटूंचा एक फोटो व्हायरल झाला. या फोटोत विनेश आणि साक्षीसह अन्य एक कुस्तिपटू हसताना दिसत होता. त्यावरून काही काळ गोंधळही माजला.
IT Cell वाले ये झूठी तस्वीर फैला रहे हैं। हम ये साफ़ कर देते हैं की जो भी ये फ़र्ज़ी तस्वीर पोस्ट करेगा उसके ख़िलाफ़ शिकायत दर्ज की जाएगी। #WrestlersProtest pic.twitter.com/a0MngT1kUa
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) May 28, 2023
पण, बजरंग याने आपल्या ट्विटर हँडलवरून दोन फोटो शेअर केले आहेत. त्यातील पहिल्या फोटोत महिला पैलवान हसतान दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोत त्यांच्या मुद्रा गंभीर आहेत. हा दुसरा फोटो खरा असून ज्या फोटोत त्या हसत आहेत, तो फोटो खोटा असल्याचा दावा पूनिया याने केला आहे. मूळ फोटोत त्या हसत नसून आयटी सेलने जाणूनबुजून फोटो मॉर्फ करून तो खोटा फोटो व्हायरल केल्याचा गंभीर आरोप बजरंग पूनियाने केला आहे.