बजरंग, विनेश परदेशात जाणार

बजरंग पुनिया व विनेश फोगट या हिंदुस्थानच्या आघाडीच्या कुस्तीपटूंना परदेशी प्रशिक्षणासाठी क्रीडा मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. टारगेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (टॉप्स)कडून या दोघांचा खर्च उचलला जाणार आहे. बजरंगला चोलपोन-अटा (किर्गिस्तान), तर विनेश हिला स्पाला (पोलंड) येथील आंतरराष्ट्रीय सराव शिबिरात पाठविले जाणार आहे.

टॉप्सदोन्ही मल्लांच्या टीमचाही खर्च उचलणार

विनेश फोगटची सराव साथीदार संगीता फोगट, फिजियोथेरेपिस्ट अश्विनी पाटील आणि बजरंगचे प्रशिक्षक सुजित मान, फिजियोथेरेपिस्ट आनंद कुमार व स्ट्रेंथ अॅण्ड पंडिशनिंग विशेषज्ञ काजी किरोन मुस्तफा हसन या सर्वांचे विमान तिकीट, प्रशिक्षण, बार्ंडगसह पॉकेटमनीचाही खर्च ‘टॉप्स’च उचलणार आहे.