बोठेच्या पत्नीची जरे यांच्या अंगरक्षकाला दमबाजी

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या पत्नीने रुणाल जरे यांच्या अंगरक्षकाला दमबाजी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी जरे यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.

रुणाल जरे हे 27 जुलै रोजी न्यायालयीन कामकाजासाठी पारनेर येथे गेले होते. यावेळी बाळ बोठे याची पत्नी सविता हिने जरे यांच्या अंगरक्षकास एकेरी भाषेचा उपयोग करून दमबाजी करण्याचा प्रयत्न केल्याचे निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी जरे यांच्या अंगरक्षकाने पारनेर पोलीस ठाण्यात बोठे यांची तक्रार केली. यावेळीही सविता बोठे पोलीस निरीक्षक कार्यालयात मोठय़ा आवाजातच बोलत होत्या. सविता बोठे यांनी आत्तापासूनच मला धमकावण्यास, दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रुणाल जरे यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या