पंतप्रधान मोदींनीच अर्णबला पुरवली बालाकोट एअर स्ट्राईकची माहिती, राहुल गांधींचा गंभीर आरोप

rahul-gandhi

बालाकोट एअर स्ट्राईक होण्यापूर्वीच रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना त्याची माहिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ही माहिती गोस्वामी यांना पुरवली, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. मात्र यासंदर्भात त्यांनी कुठलाही पुरावा सादर केला नाही. या आरोपानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

तामिळनाडू दौऱयावर असलेल्या राहुल गांधी बालाकोट एअर स्ट्राईक होण्यापूर्वीच लिक झालेल्या माहितीवरून पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांसह केवळ पाच जणांनाच कुठल्याही सैनिकी कारवाईची माहिती असते. मात्र काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराला बालाकोट एअर स्ट्राईकबाबत आधीच माहिती मिळाल्याचे समोर आले आहे. हा हवाईदलाच्या जवानांसोबत विश्वासघात असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

चौकशीचे आदेश का नाही?

बालाकोट एअर स्ट्राइकबाबत केवळ पंतप्रधान, संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गृहमंत्री आणि हवाई दल प्रमुख यांना माहिती होती. या व्यतिरिक्त अन्य कुणालाही एअर स्ट्राईक होण्यापूर्वी कोणतीही माहिती नव्हती. यापैकी कुणीतरी एका पत्रकाराला माहिती पुरवली. एवढे होऊन सुद्धा या प्रकरणाची अद्याप चौकशी का? सुरू केली नाही. पंतप्रधान मोदी यासंदर्भात चौकशीचे आदेश देत नाहीत. त्यांच्याकडूनच एअर स्ट्राईकची माहिती लिक झाल्याचा संशय असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या