बालाकोट एअरस्ट्राईकचा थरार मोठय़ा पडद्यावर

490

हिंदुस्थानच्या हवाई दलाची शौर्यगाथा सांगणारा बालाकोट एअरस्ट्राईकचा थरार आता मोठय़ा पडद्यावर बघायला मिळणार आहे. संजय लीला भंसाली आणि भूषण कुमार यांनी बालाकोट हल्ल्यावरील चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली. अभिषेक कपूर हे चित्रपटाची पटकथा लिहिणार आहेत. महावीर जैन आणि प्रज्ञा कपूर यांची सहनिर्मिती आहे. 14 फेबुवारी रोजी पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला होता. हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर 26 फेबुवारी रोजी हिंदुस्थानच्या हवाई दलाने बालाकोटमध्ये घुसून तिथले अतिरेक्यांचे तळ उद्धवस्त केले. ही यशोगाथा आता पडद्यावर बघता येईल. भंसाली प्रोडक्शनने याबाबतची अधिकृत माहिती ट्विटरवर दिली आहे. याआधी विवेक ओबेरॉयने ‘बालाकोट- द ट्रू स्टोरी’ या सिनेमाची घोषणा केलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या