पायातली चप्पल न काढल्याने अभिनेत्याने सहाय्यकाला थोबडवला

64

सामना ऑनलाईन, चेन्नई

दक्षिणेकडचे अभिनेता नंदमुरी बालकृष्णा याने पायातली चप्पल न काढल्याने त्याच्या नोकराला थोबडवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यापूर्वी देखील त्याने चित्रपटाच्या सेटवरील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चाहत्यालाही त्याने मारलं होतं.


बालकृष्णा हा अभिनेत्रींकडे बघून अश्लील शेरेबाजी करणे, कोणालाही काहीही बोलणं,  चाहत्यांच्या अंगावर धावून जाणे या गोष्टींसाठी बदनाम आहे. मात्र तरीही त्याची क्रेझ कायम आहे तो सध्या झपाड्याने चित्रपटांची शूटींग पूर्ण करत असून एक चित्रपट त्याने संपवला असून लगेच दुसऱ्या चित्रपटामध्ये त्याने काम करायला सुरूवातही केली आहे. आत्तापर्यंत १०१ चित्रपटात त्याने काम केलं आहे. असं सांगितलं जातंय की शेतकऱ्यांच्या समस्यांवर आधारीत एका चित्रपटात तो शेतकऱ्याचं काम करणार असून अमिताभ बच्चन यांची या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या