गडकरी, फडणवीस, पवारांसह दिग्गजांचे शिवसेनाप्रमुखांना अभिवादन!

11949

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 17 नोव्हेंबर रोजी महानिर्वाण दिन. मराठी मनामनात अस्मितेची मशाल प्रज्वलित करणाऱ्या आणि अवघ्या देशात हिंदुत्वाचा वन्ही चेतवणाऱ्या बाळासाहेबांना सोशल मीडियावर मानवंदना देणाऱ्या पोस्टचा पाऊस पडला आहे. नेटकऱ्यांसह राजकीय नेत्यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.

‘प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला. समाजकारणाला अग्रक्रम देणारं राजकारण, अमोघ वक्तृत्व, रोखठोक स्वभाव यामुळेच त्यांना अनुयायांचं निरपेक्ष आणि चिरंतर प्रेम मिळालं. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन’, असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

शरद पवार यांच्यासह शिवसेना नेते संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या