प्राण्यांची आईस्क्रीम पार्टी… थंडा थंडा, कूल कूल!

विदर्भात सध्या नवतप सुरू झाला असून उन्हाचा पारा 43 अंश सेल्सियसच्या वर गेला आहे. माणसांचा जीव उन्हाच्या कडाक्यामुळे लाही लाही होत असताना प्राण्यांची स्थिती काय असेल हे लक्षात घेऊन नागपूरच्या गोरेवाडा येथील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात प्राण्यांसाठी ‘आईस कँडी’चा प्रयोग केला जात आहे. अस्वलाला फळांची आईस कँडी, तर वाघाला मटणाची आईस कँडी दिली जात आहे. झाडाला एका काठीला आईस कँडी लटकवली जाते. प्राण्यांना विशिष्ट आवाज दिल्यानंतर विशेषतः पांडा व लाली नावाचे अस्वल व अन्य प्राणी धावत येऊन पँडीचा आस्वाद घेतात. कँडीमध्ये टरबूज, इतर फळे, मधाचा व बर्फाचा समावेश असतो. आठवडय़ातून एकदा हा प्रयोग केला जातो.