टकल्यांपुढे नवी समस्या, डोक्यात सोनं असल्याच्या अफवेमुळे केस नसलेल्यांची हत्या

केस गळणं, टक्कल पडणं ही जगभरातील असंख्य लोकांसमोर असलेली मोठी समस्या आहे. घनदाट केसातून हात फिरवण्याची सवय असलेल्यांना केस गेल्यानंतर गुळगुळीत टकलावरून हात फिरवताना फार वाईट वाटतं. टक्कल पडलेल्या अशा लोकांसमोर एक नवी समस्या उभी राहण्यास सुरुवात झाली आहे. टक्कल पडलेल्या लोकांच्या डोक्यात सोनं असतं अशी अफवा पसरायली आहे, या अफवेतून टक्कल असलेल्यांचे खून व्हायला सुरुवात झाली आहे.

‘मसाज’साठी गेलेला नवरा ‘तसला’ आजार घेऊन आला, भडकलेल्या बायकोने केले तांडव

पश्चिम आफ्रिकेच्या मोझांबिक प्रांतात एका व्यक्तीचं शिर धडावेगळं करण्यात आलं. आरोपी हे शिर विकणार होते, मात्र सौदा होण्याआधीचे मुंडकं खरेदी करणारा पळून गेला. यामुळे आरोपींनी हे शिर मुआंडिवा. जी माणसं टकली असतात ती श्रीमंत होतात आणि त्यांच्या डोक्यात सोनं असतं अशी अफवा असून या अफवेमुळे या व्यक्तीचा खून करण्यात आला होता. मेट्रो या वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सेक्स करताना गुप्तांगावर दात रुतवायचा, न्यायालयाने कवळी जप्त करण्याचे आदेश दिले

2017 साली बीबीसीने देखील अशाच प्रकारचे एक वृत्त दिले होते, ज्यामध्ये म्हटले होते की मानवाच्या विशिष्ट अवयवांसाठी त्यांचा खून करण्याचे प्रमाण वाढले होते. अशा किमान 5 घटनांबाबत बीबीसीने त्यांच्या बातमीत माहिती दिली होती. यातल्या तिघांची एकाच आठवड्यात हत्या करण्यात आली होती. असं सांगितलं जातंय की या अफवा जादूटोणा आणि अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांकडून पसरवल्या जातात. या डॉक्टरांना शरीराचे विशिष्ट भाग हवे असतात, ज्यामुळे ते आरोपींना हे पटवून देतात की त्यामध्ये काहीतरी विशिष्ट गोष्टी दडलेल्या आहेत. टक्कल पडलेल्यांच्या डोक्यात सोनं असतं ही अफवा हे त्याचंच एक उदाहरण आहे.

कोंबड्याने दिलं अंडं, न्यायालयाने सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा

आफ्रिकेमध्ये विशिष्ट अवयवांसाठी माणसांचे मुडदे पाडण्याच्या घटना या नव्या नाहीत. ‘अल्बिनो’ म्हणजे केसापासून पायाच्या नखापर्यंत पांढरे फटफटीत असलेल्या लोकांची हत्या केल्याच्या घटना फक्त आफ्रिकाच नाही तर जगाच्या विविध भागांतून ऐकायला मिळतात. आफ्रिकेमध्ये लोकांना ठार मारून त्यांच्या शरीरातील विविध भागांची तस्करी देखील केली जाते. करण्याचे प्रमाणह