शहिदांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी बालयोगी वरद देत आहे योगाचे धडे

116

राजेश देशमाने । बुलढाणा

देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगावमही येथे इयत्ता दुसरीत शिक्षण घेणारा बालयोगी वरद संतोष जोशी हा पुलवामा व गडचिरोली येथे शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना मदत करण्यासाठी पुढे धजावला आहे. ७ जूनपासून राज्यभर योग शिविर घेऊन तो योगाचे धडे देत आहे. आतापर्यंत त्याने ४ ठिकाणी योगशिबीर घेवून २५ हजारांचा निधी गोळा केला आहे. वर्षभरात विविध शिबीराद्वारे ५ लाख रुपये गोळा करुन त्याला हा निधी शहीद जवानांच्या कुटूंबीयांना द्यायचा आहे.

मुंबई, पुणे, नाशिक सह मुख्य ठिकाणी तर ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयांमध्ये वरदचे ३५० शिबिर झाले आहे. यातून चार लाख विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले आहे. टिव्ही समोर बघून आज मुले बिघडत असल्याचा गैरसमज दूर करून वरदने टिव्ही बघत रामदेव बाबांची योगापध्दती आत्मसात केली. हळूहळू काही दिवसातच तो सर्व आसने शिकला, वडील हॉटेल चालवतात तरीही कुठलीही फि न घेता वरदने सर्व शिबिर पार पाडले. दरम्यान त्याची एका संस्थेवर योग शिक्षक म्हणून निवड देखील झाली आहे. तसेच जागतिक योग दिनाचे महत्त्व एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता शाळा शिकून हा चिमुकला दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर बसून गावागावात फिरला.

७ जूनपासून तो बुलढाणा जिल्ह्यातील नुकतेच शहीद झालेल्या पुलवामा हल्ल्यातील नितीन राठोड, संजय राजपूत तर काल गडचिरोली जिल्ह्यातील जांभुरखेडा येथे नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप खाडे, राजू गायकवाड या चार जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा चिमुकला त्यांच्या मदतीसाठी योगाचे धडे गिरवत आहे. दरम्यान समाजसेवी संस्थांनी शिविर आयोजित करावे यासाठी ९३५९१४३१०३ या नंबर संपर्क साधावा, असे आवाहन बालयोगी वरद व वडील संतोष जोशी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या