विरोधकांच्या कोंडीत सापडून इम्रान हतबल, इस्लामफोबिया लिखाणावर बंदी घालण्याचे फेसबुकला साकडे

देशात भडकलेली महागाई आणि बेरोजगारीमुळे 11 विरोधी पक्षांनी एकजूट करीत पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे. त्यामुळे आता आपल्या अपयशाचे खापर काढत्या ईस्लामफोबियावर फोडणारी कृती इम्रान यांनी केली आहे.

वाढत्या इस्लामफोबियामुळे. कट्टरतावादाला प्रोत्साहन मिळत आहे. तसेच जगभरात हिंसाचारही वाढीस लागणार आहे. खासकरुन सोशल मीडियाच्या माध्यमातून या इस्लामफोबियाला चालना मिळतेय असा दावा  इम्रान यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकर इस्लामबद्दल द्वेष निर्माण करणारा मजकूर पोस्ट करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. त्यांनी त्यासाठी थेट फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग यांना पत्र लिहिले आहे. इम्रान यांनी सोमवारी ट्विटटवरुन मार्क झकरबर्ग यांना पत्र लिहिल्याची माहिती दिली. मुस्लिमांमध्ये कंट्टरपंथीय भावना वाढीस लागेल, असा इशाराही इम्रान खान यांनी दिला आहे.

होलोकॉस्टप्रमाणेच ईस्लामफोबिया वाणाऱया लिखाणारही बंदी हवी

‘होलोकॉस्ट म्हणजे जर्मनीत नाझींनी केलेल्या ज्यूंच्या नरसंहाराशी संबंधित कुठलाही कंटेट फेसबुकवर पोस्ट करण्यावर बंदी घालण्याचा तुमचा निर्णय योग्य आहे, तसेच इस्लामफोबियाशी संबंधित पोस्टवरही बंदी घाला’ अशी मागणी इम्रान खान  यांनी केली आहे.

होलोकॉस्टप्रमाणेच इस्लामोफोबियाकर बंदी घालण्याची मागणी करताना इम्रान यांनी ट्विटमध्ये हिंदुस्थान आणि फ्रान्सवरही टीका केली आहे. हे दोन्ही देश मुस्लिमांबद्दल भेदभाव करीत असल्याने कट्टरतावाद  वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हिंदुस्थानने सीएए-एनआरसी कायदा लागू केला, त्यामुळे मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा कंठशोष  इम्रान यांनी केला आहे. फ्रान्सवरही त्यांनी इस्लामफोबियाला प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या