अवैध दारू विक्री बंद करा, पोलिसांना निवेदन

48

सामना ऑनलाईन । कासार बालकुंदा

निलंगा तालुक्यातील हत्तरगा हलसी येथे अवैध दारू विक्री जोरात सुरू आहे. त्यावर ती योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी समस्त गावकऱ्यांनी केली आहे. गावातील महिला सरपंच शुभांगी पंडित फुलसुरे यांनी सर्व महिलांना घेऊन कासार सिरसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांना ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन तसेच गावातील नागरिकांच्या सह्या घेऊन निवेदन दिले. दारुमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. तसेच तरुण दिवसेंदिवस व्यसनाधीन होत आहे त्यामुळे गावातील महिलांनी पुढाकार घेऊन गावामध्ये सुरू असलेल्या अवैध धंदे तात्काळ बंद करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. गावामध्ये अवैध दारू मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने मद्यपी दारू पिऊन रस्त्याने झिंगाट फिरत असलेले दिसत आहेत.

गावातील अवैध दारूबंदीविषयी आम्ही बालाजी कुकडे यांना निवेदन दिले. त्यांनी लवकरात लवकर यावर ती कारवाई करू असे सांगितले. याची एक प्रत पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्री यांना देण्यात येणार असल्याचे सरपंच शुभांगी फुलसूरे म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या