उत्तर प्रदेशमध्ये सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणावर बंदी

467

उत्तर प्रदेशमध्ये सार्वजिक ठिकाणी नमाज पठणास बंदी घालण्यात्त आली आहे. राज्य सरकराने तसा निर्णय जाहीर केला आहे. तसेच रस्त्यांवरही नमाज पठणावर राज्य सरकारने बंदी घातली आहे.

पोलीस महासंचालक ओ.पी सिंह म्हणाले की, “सण, उत्सवांच्या दिवशी जेव्हा मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात तेव्हा जिल्हा प्रशासनाकडून तशी परवानगी दिली जाते.” परंतु प्रत्येक शुक्रवारी  (जुम्मा) नमाजासाठी अशी परवानगी देता येणार नाही  असे सिंह यांनी स्पष्ट केले.

सर्व जिल्हा पोलीस प्रमुख आणि अधिकार्‍यांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत. डीजीपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील अधिकार्‍यांना मौलवी आणि मशीद प्रशासनाशी चर्चा करण्यास सांगितले आहे. तसेच रस्त्यावर नमाज पठण केल्यास वाहतुकीवर कसा परिणाम होतो हे पटावून देण्याची जवाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना खालिसा राशिद फिरंगी यांनी आपल्या समाजबांधवांना रस्त्यावर नमाज पठण न करण्याचे आवाहन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या