प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वज वापरू नका!

42

ठाणे: राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून प्रजासत्ताक दिनी प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरू नका असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे. दरवर्षी प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्यदिन, महाराष्ट्रदिन, इतर राष्ट्रीय कार्यक्रम व महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्यावेळी नागरिकांकडून कागदाच्या व प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर फाटलेले कागदी तसेच प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्त: पडलेले असतात. असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. यामुळे खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशा प्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सूर्यास्तानंतर जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या