TikTok Ban टिकटॉकवाल्यांच्या पोटात व्हायला लागलं पुक..पाक, अमेरिकाही बंदी घालणार

762

हिंदुस्थानपाठोपाठ अमेरिकाही चिनी अॅप टिकटॉकवर बंदी घालणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनीच ही माहिती दिली आहे. टिकटॉकद्वारे चिनी गुप्तचर यंत्रणा माहिती गोळा करत असल्याचा संशय व्यक्त करत अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. एअरफोर्स वनच्या कार्यक्रमात बोलत असताना ट्रम्प यांनी म्हटले की “आम्ही अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालणार आहोत, याबाबतच्या कागदपत्रांवर मी उद्याच सही करणार आहे ” हे अॅप चिनी कंपनी बाईटडान्सचे असून जगभरात याचे असंख्य वापरकर्ते होते. कोरोना व्हायरसच्या प्रसारानंतर अनेक देश चीनवर नाराज असून त्यांनी चीनबाबत आता कठोर भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. यामुळे या अॅपच्या वापरकर्त्यांमध्ये घट व्हायला लागली आहे.

World News Photo – जगभरातील काही महत्वाच्या बातम्या वाचा फक्त 8 सेकंदात

हिंदुस्थाननेही घातली आहे टिकटॉकवर बंदी
लडाख सीमेवर चिनी माकडांनी कुरापती सुरु केल्या होत्या. त्यांनी विश्वासघाताने हिंदुस्थानच्या 20 जवानांचे प्राण घेतले होते. त्यानंतर हिंदुस्थान आणि चीन देशांत कमालीचे तणावपूर्ण बनले होते आणि संघर्षमय वातावरण तयार झाले होते. शांततेच्या बैठका सुरू असतानाही चीनच्या कुरापती थांबल्या नव्हत्या.यामुळे गेल्या महिन्यात हिंदुस्थान सरकारने चीनला जोरदार झटका दिला आणि ‘टिकटॉक’सह अनेक अॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते.

कोटय़वधी हिंदुस्थानींच्या मोबाईल फोनमध्ये घुसखोरी केलेले ‘टिकटॉक’ अखेर बंद झाले. केंद्र सरकारने 59 चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय जारी केला होता. टिकटॉकने थोडय़ाच अवधीमध्ये हिंदुस्थानातील कोटय़वधी मोबाईल धारकांवर मोहिनी घातली होती. फुकटात प्रसिद्धीच्या हव्यासापोटि का होईना पण अनेक सेलिब्रिटिंनाही त्याची भुरळ पडली होती. मात्र मनोरंजन करता-करता या अॅपने त्याची नियंत्रण रेषा ओलांडली होती. त्याद्वारे ग्राहकांची खासगी डाटा चोरला जातो अशा अनेकांच्या तक्रारी होत्या. टिकटॉकचा वापर समाजात द्वेष पसरवण्यासाठीही होऊ लागला होता. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कॉम्प्युटर इमर्जेन्सी रिस्पॉन्स टिमकडे त्यासंदर्भात अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेऊन माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 69 (अ) अन्वये सरकारने बंदीची कारवाई केली.
टिकटॉकसह बंदी घातलेल्या चीनी अॅप्समध्ये शेअरइट, हेलो, क्लब फॅक्टरी, व्हायरस क्लीनर, वुई चॅट, एमआय कम्युनिटि, वॉल्ट, हॅगो प्ले, विगो व्हिडियो आदी अॅप्सचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या