रत्नागिरी तालुक्यात पानवल गावात विधवा प्रथा बंदीचा एकमुखी ठराव

रत्नागिरी तालुक्यातील पानवल गावात विधवा प्रथा बंदीचा एकमुखी ठराव संमत करण्यात आला. 8 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला.

या ग्रामसभेत विधवा अनिष्ठ प्रथा व त्यामुळे स्त्रियांना भविष्यात होणार्‍या त्रासाबाबत भोगाव्या लागणार्‍या यातना याची माहिती ग्रामसचिव नयना पंगेरकर यांनी उपस्थित ग्रामसभेत दिली. ग्रामपंचायत सदस्य शशिकांत कांबळे व संजय होरंबे यांनी अनिष्ठ प्रथा व अंधश्रध्दा याबाबत आपले मत मांडत अनिष्ठ प्रथेतून स्त्रियांना मुक्ती मिळावी व त्यांनी पती पश्चातही आपल्या जीवनात न घाबरता आणि न डगमगता आयुष्य पूर्वीप्रमाणेच उपभोगावे असे मत मांडले. विधवा प्रथा बंदीला ग्रामस्थांकडून एकमुखी सहमती दर्शवण्यात आली. 15 ऑगस्ट रोजी विधवा महिलांसाठी हळदी कूंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या महत्वाच्या निर्णयाला एकात्मिक बालविकास प्रकल्प सुपरवायझर पाटील, भिकाजी विठ्ठल घवाळी, शाम रामचंद्र घवाळी, शंकर विठू होरंबे, गणपत भिकाजी होरंबे, नंदकुमार अर्जून आपकरे, अनंत शंकर होरंबे, शांताराम रत्नू होरंबे, उमेश शिंदे, रामेश्वर शंकर लिंगायत, सुरेश सोनू होरंबे, गणपत यशवंत होरंबे उपस्थित होत्या. या बैठकीत अपर्णा विकास बोरकर यांची तंटामुक्त अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या ग्रामसभेला सरपंच तनिष्का होरंबे, उप सरपंच रविंद्र मांडवकर सदस्य शशिकांत कांबळे, संजय होरंबे, राकेश घवाळी, अपर्णा बोरकर, श्वेता मांडवकर, प्रसिध्दी होरंबे, अक्षरा शिंदे, ग्रा.सचिव पंगेरकर मॅडम श्री.विजय पवार, सायली पवार, रामचंद्र होरंबे, पांडुरंग भोळे, दाजी तांबे, महेंद्र कांबळे, सूर्यकांत कांबळे, संजय कांबळे, सचिन तांबे, सुहास होरंबे, शांताराम होरंबे, अनिल कुरतडकर उपस्थित होते.