वांद्रे पूर्व विधानसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर

राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते युवासेना प्रमुख पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी वांद्रे पूर्व विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या सर्व नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

उप-विधानसभा समन्वयक – प्रसाद पाटील, सोशल मीडिया विधानसभा समन्वयक – शिवम जाधव, शाखा युवा अधिकारी – संतोष दिगंबर पांगळे (शाखा क्र. 88), शाखा समन्वयक – राकेश गव्हाली (शाखा क्र. 88), शाखा युवा अधिकारी – राशिद शेख (शाखा क्र. 96).

 

आपली प्रतिक्रिया द्या