बेछूट शिव्यांचा गोळीबार करणारा ‘बंदूक्या’ १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार

51

सामना ऑनलाईन । मुंबई

“काय गं डंगरे, कशाला नाचतीस?….तुझ्या आईच्या वरातीत नाचती”; अशी तुफान डायलॉगबाजी आणि बेसुमार शिव्यांच्या धडाका असलेला “बंदूक्या” हा सिनेमा १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. वर्षा सिनेव्हिजनची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन राहूल मनोहर चौधरी यांनी केलं आहे. अभिनेत्री अतिशा नाईक, अभिनेता शशांक शेंडे, नामदेव मुरकूटे, निलेश बोरसे, अमोल बागुल, तन्मयी चव्हाणके, उन्नती शिखरे यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.

समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या हृदय हेलावणाऱ्या रूढी परंपरेची झलक या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘बंदूक्या’ सिनेमाने ६ नामांकनं आणि ४ राज्य पुरस्कार पटकावले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या