रात्री 2 वाजता यायचा, दरवाजा ठोठावायचा अन् कंडोमचे पाकिट फेकून पळून जायचा

49437

देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या अनेक घटना समोर येत असतानाच कर्नाटकमधील बंगळुरू या शहरामध्ये विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. येथे एक अज्ञात व्यक्ती एका महिलेच्या घरी रात्री यायचा, आणि दरवाजा ठोठावून कंडोमचे पाकिट फेकून पळून जायचा. यामुळे घाबरलेल्या महिलेने पुत्तेनहाली पोलीस स्थानकामध्ये धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे.

पीडित महिलेने पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार, एक अज्ञात व्यक्ती रात्री दोन वाजता आला आणि जोरजोरात दार ठोठावू लागला. दार ठोठावूनही दाद देत नसल्याचे पाहून आरोपीने घराची एक खिडकी उघडली आणि लाईट लावली. त्याने अनेकदा लाईट चालू-बंद केली. यामुळे महिला आणखी घाबरून गेली. महिलेने तरीही दरवाजा न खोलल्याने आरोपीने खिडकीतून कंडोमचे पाकिट फेकले आणि पळून गेला.

… म्हणून कुटुंबातील 11 जणांनी एकमेकांशीच केले 23 वेळा लग्न, कारण वाचून धक्का बसेल

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिलेला शॉक बसला असून तिने 100 नंबर डायल करून पोलिसांना याची माहिती दिली. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी महिलेच्या घरी धाव घेतली मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. पीडितेच्या घरातील हॉलमध्ये कंडोमचे अनेक पाकिटं विखूरल्याचे दिसले.

एक्स बॉयफ्रेंडला लग्न करायचं नाही, पण बाप व्हायचंय; गर्भवती तरुणी हैराण

दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात पुत्तेनहाली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आजूबाजूच्या घरांवर असणारे सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या