बांगलादेशची १००वी कसोटी संस्मरणीय, श्रीलंकेवर ४ गडी राखून दणदणीत विजय

26

सामना ऑनलाईन, कोलंबो

बांगलादेशच्या क्रिकेट संघाने १००वी कसोटी संस्मरणीय केली. कोलंबो येथे झालेल्या कसोटीत पाहुण्या बांगलादेश संघाने यजमान श्रीलंकेवर ४ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत राखली. पहिल्या डावात ४९ धावा आणि दुसऱ्या डावात ८२ धावा फटकावणाऱ्या तमीम इक्बालची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. तसेच एक शतकानिशी १६२ धावा आणि ९ बळी गारद करणाऱ्या शाकीब उल हसनची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली.

पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर बांगलादेशने श्रीलंकेचा दुसरा डाव ३१९ धावांमध्ये गुंडाळला. डावखुरा फिरकी गोलंदाज शाकीब उल हसनने ४ व मुस्तफिजुर रहमानने ३ बळी गारद केले. दिलरुवान परेराने ५० धावा आणि सुरंगा लकमालने ४२ धावा केल्या. १९१ धावांचा पाठलाग करणाऱया बांगलादेशने ६ गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. तमीम इक्बालने १ षटकार व ७ चौकारांनिशी ८२ धावांची आश्वासक खेळी साकारली. सब्बीर रहमानने ४१ धावा चोपून काढल्या. दिलरुवान परेरा व रंगाना हेराथ यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक
श्रीलंका पहिला डाव ३३८ धावा आणि दुसरा डाव ३१९ धावा
बांगलादेश पहिला डाव पहिला डाव ४६७ धावा
दुसरा डाव ६ बाद १९१ धावा

आपली प्रतिक्रिया द्या