#Article370 बांग्लादेशची पहिली प्रतिक्रिया, पाकिस्तानला झटका

2693

जम्मू-कश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 हटवण्याच्या हिंदुस्थानच्या निर्णयावर शेजारील राष्ट्र बांग्लादेशने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बांग्लादेशने हा हिंदुस्थानचा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हटले आहे. बांग्लादेशच्या परराष्ट्रमंत्रालयाने याबाबत अधिकृत वक्तव्य दिले आहे.

‘जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवणे हा संपूर्णपणे हिंदुस्थानचा अंतर्गत मुद्दा आहे. यावर बांग्लादेश आपल्या या विधानावर कायम आहे. तसेच बांग्लादेशने नेहमीच आशिया खंडात शांतता, स्थिरता आणि विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य दिले आहे’, असे परिपत्रक बांग्लादेशच्या परराष्ट्रमंत्रालयाने प्रसिद्ध केले आहे.

पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार
संयुक्त राष्ट्रामध्ये जम्मू-कश्मीरचा मुद्दा उचलण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसला आहे. येथे चीनसोडून अन्य सदस्य देशांनी हिंदुस्थानला पाठिंबा देत हा त्यांचा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हटले. जगातील कोणताच मोठा देश आपल्या बाजूने नसल्याचे पाकिस्तानला कळाले असून आता त्यांनी या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांचा मध्यस्थतेचा प्रस्ताव
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसेच इम्रान खान आणि डोनाल्ड ट्रम्प याची देखील फोनवर चर्चा झाली. यानंतर दोन्ही देशातील संघर्ष टाळण्यासाठी आपण मध्यस्थता करण्यास तयार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. परंतु हिंदुस्थानने कायमच हा दोन देशातील मुद्दा असून तिसऱ्या देशाने यात नाक खूपसू नये ही भूमिका घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या