रोहिंग्यांचा बांगलादेशाला धोका!- पंतप्रधान शेख हसिना

624

म्यानमारमधून बांगलादेशमध्ये आश्रयाला आलेले रोहिंग्या हे देशासाठी धोकादायक तर आहेतच; पण ते हिंदुस्थानी उपखंडासाठीही धोकादायक असल्याचे खळबळजनक विधान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी केले आहे. ढाक्यातील जागतिक परिसंवादात त्या बोलत होत्या. म्यानमारच्या रखिने प्रांतात झालेल्या धार्मिक दंगलीनंतर तेथील रोहिंग्या मुस्लिमांनी जीव वाचवण्यासाठी दुसऱया देशांमध्ये पलायन केले. त्यापैकी सुमारे 10 लाख रोहिंग्या बांगलादेशच्या आश्रयाला आले आहेत.  मात्र हेच रोहिंग्या बांगलादेशसाठी डोकेदुखी बनले आहेत.

आता जगानेच तोडगा काढावा!

बांगलादेशातील रोहिंग्यांमुळे देशाला निर्माण झालेल्या धोक्याची जगाने वेळीच दखल घ्यावी आणि यावर तोडगा काढावा. कोणताही देश सुरक्षित नसेल आणि तिथे शांतता नांदत नसेल तर त्या देशाला विकास करणे शक्य होणार नाही. त्यामुळे हा गुंता सोडवण्यासाठी जगाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही शेख हसिना यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या