सरकारने कायमस्वरूपी रहिवाशी परवाना द्यावा- तस्लिमा नसरीन

27

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गेली काही वर्षे हिंदुस्थानमध्ये अज्ञातवासात राहत असलेल्या बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना हिंदुस्थानने आज आणखी एक वर्षासाठी रहिवाशी परवाना वाढवून दिला. त्यावर समाधान व्यक्त करून सरकार मला कायमस्वरूपी रहिवाशी परवाना देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

तस्लिमा म्हणाल्या, ‘हिंदुस्थान हे माझे घर आहे. मी हिंदुस्थानी कन्या आहे. त्यामुळे मला हिंदुस्थानमध्ये राहण्यासाठी एक एक वर्षाचा रहिवाशी परवाना देण्याऐवजी मला 5 वर्षे, 10 वर्षे किंवा कायमस्वरूपी परवाना सरकारने द्यावा. 2014मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनाही मी तशी विनंती केली होती.’

मूळच्या बांगलादेशी असलेल्या तस्लिमा यांची ‘लज्जा’ कादंबरी वादग्रस्त ठरली. कट्टरवादी मुस्लिमांच्या विरोधानंतर बांगलादेशनंतर त्यांनी स्वीडनचे नागरिकत्व घेतले. 2004 पासून त्या हिंदुस्थानमध्ये राहत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या