Bank Strike – बँका सलग तीन दिवस राहणार बंद!

3057

सलग जोडून आलेल्या सुट्टया आणि बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप यामुळे बँकिंग सेवा विस्कळीत होणार आहे. ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’ने महिनाअखेरीस संपाची हाक दिली आहे. पगारवाढीसह अन्य मागण्यांसाठी बँक कर्मचारी महिनाअखेरीस म्हणजे 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला संपावर जाणार आहेत, तसेच रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहे.

बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने दोन दिवस काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. यासह मार्च महिन्यात 3 दिवस आणि एक एप्रिलपासून अनिश्चितकालासाठी संपावर जाण्याचा इशाराही युनियन्सने दिला आहे. याआधी 8 जानेवारीला करण्यात आलेल्या संपात बँक कर्मचाऱ्यांच्या 6 संघटनांनी सहभाग घेतला होता.

‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’च्या वतीने महिनाअखेरीस हा बंद पुकारण्यात आल्याने देशभरातील बँकांमधील कामकाज सलग तीन दिवस (रविवारची सात्पाहिक सुट्टी धरून) ठप्प राहणार आहे. महिन्याच्या अखेरीस हे आंदोलन होत असल्याने पगारालाही विलंब होण्याची शक्यता आहे. तसेच एटीएममध्येही पैशांची टंचाई भासण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जानेवारीसह मार्च महिन्यात 11, 12 आणि 13 तारखेलाही बँका बंद ठेवण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास 1 एप्रिलपासून अनिश्वितकालासाठी संपावर जाण्याची घोषणाही युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या