पीक विमा भरण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा रविवारी सुरू राहणार

142

सामना प्रतिनिधी । लातूर

पंतप्रधान पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना गैरसोय होऊ नये यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा रविवारी दिनांक 21 जुलै रोजी सुरू राहणार आहेत. गेल्या तीन- चार दिवसापासून लातूर जिल्ह्यातील सर्व शाखेत पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली दिसत आहे. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून बँकेच्या संचालक मंडळ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे

पीक विमा भरण्याची अंतिम तारीख 24 जुलै असून रविवारी सर्व शाखेत केवळ पीक विमा भरण्यासाठी खुल्या राहतील अशा सूचना जिल्यातील सर्व शाखेला दिलेल्या आहेत. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाठ, कार्यकारी संचालक एच जे जाधव, सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे

आपली प्रतिक्रिया द्या