नववधूच्या खोलीत सारखा येत जात असल्याने वधूपित्याने नवऱ्याच्या कानाखाली मारली

लग्नाचे विधी सुरू असताना नवरा मुलगा सारखा सारखा नववधूच्या खोलीत जात होता. हे पाहून वधूपित्याला जाम राग आला होता. सारखा सारखा नवरीच्या खोलीत कशाला जातोस असं म्हण वधूपित्याने या तरुणाला जाब विचारला होता. यानंतर वधूपित्याने त्याच्या सणसणीत कानाखाली मारली होती. यामुळे भडकलेल्या नवऱ्यानेही वधूपित्याच्या कानाखाली मारली. हा प्रकार ऐकल्यानंतर नववधू भडकली आणि तिने लग्नास नकार दिला, ज्यामुळे नवरा मुलगा वरात घेऊन घरी परतला.

उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातल्या शिवरामपूर भागातील गावातल्या तरुणाचे लग्न कानपूरच्या बर्रा भागात राहणाऱ्या तरुणाशी ठरलं होतं. तरुण नवऱ्या मुलीच्या घरी वरात घेऊ आला होता. विधींना सुरुवात झाली होती. लग्न झाल्यानंतर आपण आपल्या बोयकोला थेट 4-5 दिवसांनी भेटणार असल्याचे नवऱ्या मुलाला माहिती होतं. असं न करता नवरीने थेट आपल्या घरी चलावे यासाठी तो तिची मनधरणी करत होता. मनधरणीसाठी तो सारखा तिच्या खोलीत ये-जा करत होता. विधी सुरू असताना नवऱ्याची सुरू असलेली ही धावपळ पाहून नवरीच्या वडिलांना राग आला होता. त्यांनी लग्नविधी सुरू असलेल्या ठिकाणी नवऱ्याला गाठून त्याच्या कानाखाली ठेवून दिली. यावर नवऱ्यानेही नववधूच्या सासऱ्यांच्या कानाखाली ठेवून दिली. हा प्रकार जेव्हा नववधूला कळाला तेव्हा तिने लग्न मोडत असल्याचा निर्णय जाहीर केला.