बार्बी दिसणार हिंदुस्थानी पोषाखात

35

सामना प्रतिनिधी । मुंबई

लहान मुलींना हवीहवीशी वाटणारी. आपल्याच जीवनाचा एक भाग असल्यासारखे वाटणारी बार्बी नेहमीच वेस्टर्न पोषाखात दिसते, पण आता हीच बार्बी आता हिंदुस्थानी पोषाखात दिसणार आहे. मॅटेल टॉइजच्या शाखेने ही जबाबदारी घेतली असून हिंदुस्थानच्या विविध संस्कृतीतून प्रेरणा घेऊन संस्थेने खास सहा पोषाख तयार केले आहेत. त्यामुळे ही बार्बी आपल्याला सहा विविध रूपांत पाहायला मिळणार आहेत. ‘कलर्स ऑफ इंडिया’ या मालिकेतून हिंदुस्थानातील ऐतिहासिक स्थळांचा उलगडा करण्यात येतो. त्याचाच धागा पकडून सहा रूपांतील पोषाख तयार करण्यात आले आहेत. या पोषाखातून हिंदुस्थानचा सांस्कृतिक ठेवा आणि वैविध्यपूर्ण सौंदर्य अगदी खुलून दिसते. हवा महलमधूनही बार्बीच्या एका पोषाखासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे. हवा महलमधील भरीव नक्षीकाम असलेला गुलाबी लेहंगा बार्बीसाठी तयार करण्यात आला आहे. याशिवाय मदुराईमधील रॉयल थिरुमलाई नायकर महलामधूनही प्रेरणा घेण्यात आली आहे. या महलामधील विविध सुरेख रचना आणि सोन्याने मढवलेले छत यांचे अंतरंग बार्बीची साडी डिझाईन करण्यासाठी वापरण्यात आलेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या