‘नागिन‘ कशामुळे झोपली माहिती आहे?

सामना ऑनलाईन, मुंबई

हिंदुस्थानात कोणता कार्यक्रम,कोणती वाहिनी प्रेक्षकांच्या पसंतीची आहे हे ठरवण्यासाठी बार्क या संस्थेची आकडेवारी बघितली जाते. आधी यासाठी टीआरपी हे परिमाण होतं मात्र त्याची जागा आता बार्कने घेतली आहे. या बार्कच्या सर्वोत्तम वाहिन्यांच्या यादीमध्ये दूरदर्शनने आश्चर्यकारकरित्या पहिला नंबर मिळवला आहे. याचं कारण हे दूरदर्शनवरचे कार्यक्रम नसून चॅम्पियन्स ट्रॉफी आहे.

या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत हिंदुस्थानी संघ खेळत होता. अंतिम सामन्या हिंदुस्थान विरूद्ध पाकिस्तान मुकाबला असल्याने त्यादिवशीही अनेकांनी दूरदर्शनवरून हा सामना पाहिला होता. या स्पर्धेमुळे खाजगी टीव्हीवरील मालिकांचं स्थान बार्कच्या क्रमवारीत घसरलं आहे. हिंदी मालिकांमध्ये नागिन ही एक नंबरची मालिका होती जी चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे चार नंबरवर घसरली आहे. बार्कच्या या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावार हिंदुस्थान विरूद्ध बांग्लादेश सामना तर दुसऱ्या क्रमांकावर हिंदुस्थान विरूद्ध दक्षिण अफ्रिकेचा सामना आहे.

आपली प्रतिक्रिया द्या