बिकीनीमध्ये दीपिका दिसताच हाणामारी, बरेलीच्या सिनेमागृहात तुफान राडा

वादग्रस्त पठाण सिनेमावरुन उत्तर प्रदेशातील बहेलीमधील एका मॉलमध्ये दोन गडात तुफान राडा झाला. यामुळे संपूर्ण मॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. या दरम्यान अनेकजण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरण शांत केले. या तुफान राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून बुधवारी रात्री उशिरा घडली

मिळालेल्या माहितीनुसार, बरेलीतील एका मॉलमध्ये पठाण सिनेमा सुरू होता. दीपिकाच्या भगव्या बिकिनीतील ‘बेशरम’हे गाणे येताच काही खोडकरांनी विचित्र कमेंट्स करायला सुरुवात केली. मोबाईलवरून सिनेमाचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. त्यावेळी सिनेमा हॉलच्या कर्मचार्‍यांनी व्हिडिओ बनवण्यास रोखले आणि ते नियमांच्या विरोधात असल्याचे सांगितले. यावरून झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हाणामारीची माहिती मिळताच इज्जतनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि काही लोकांना ताब्यात घेतले, त्यानंतर प्रकरण शांत झाले. सिनेमा हॉलमध्ये पोस्ट केलेल्या बाऊन्सर्सनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्याचे कपडे फाडले.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींची ओळख पटवत आहेत. इज्जतनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अरुण श्रीवास्तव यांनी सांगितले की, सिनेमागृहात मारहाण करणाऱ्या तरुणांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. अनेक मुलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात असून काहींची ओळख पटली आहे. गंभीर जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमचा पठाण सिनेमा बुधवारी देशभरात प्रदर्शित झाला. सिनेमागृहांमध्ये अॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. बिहारमधील भागलपूरपासून ते मध्य प्रदेशातील इंदूर आणि ग्वाल्हेर, छत्तीसगडमधील दुर्ग, बिलासपूर आणि रायपूर, राजस्थानमधील जयपूर आणि कर्नाटकातील बेंगळुरूपर्यंत आंदोलन करण्यात आले होते. मुंबई, कानपूर सारख्या अनेक शहरांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. काही ठिकाणी पोस्टर फाडून जाळण्यात आले तर काही ठिकाणी सिनेमागृहांबाहेर घोषणाबाजी करण्यात आली. याउलट अनेक ठिकाणी शाहरुख खानच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने चित्रपटाचे सेलिब्रेशन केले.