My फिटनेस Funda : माझे  पॅशन म्हणजेच आरोग्य

 >> मनीषा डांगे, बास्केटबॉल खेळाडू 

फिटनेस म्हणजे: तंदुरुस्त राहणे. वय वाढलं तरी शारीरिक आरोग्य चांगले ठेवणे.  

बास्केटबॉल की आरोग्य? : नक्कीच बास्केटबॉल. कारण बास्केटबॉल असेल तर माझे आरोग्य असेल. कारण तो चांगला खेळण्यासाठी मी आरोग्याची जास्त काळजी घेते. ते माझं पॅशन आहे.   

डाएट की जीवनशैली? : डाएट. डाएट चांगलं असेल तर जीवनशैली नक्कीच चांगली होईल.  

सामान्य माणसासाठी फिटनेस: सामान्य माणसाने त्याचे रुटिन व्यवस्थित ठेवावे. सकाळी थोडा व्यायाम, डाएट, योग. पैसा कमावण्याच्या मागे न धावता आरोग्यासाठी वेळ काढायला हवा.  

व्यायाम कसा करावा? : योग हे सगळ्यात प्रभावी औषध आहे. ज्यांना खूप वेळ मिळत नाही, त्यांनी योगासाठी दिवसभरातून तासभर दिला तरी पुष्कळ आहे. ज्यांना वेळ मिळतोय त्यांनी सकाळी चालावे, जिमला जावे, घरीच व्यायाम करावा.  

व्यायाम आणि डाएट समतोल कसा राखता? :  व्यायाम हा डाएटशी संबंधित आहे. डाएट जर चांगला असेल तर तुम्ही कितीही चांगला व्यायाम केला तरी पण त्याचा वाईट परिणाम शरीरावर होत नाही. तुमचा डाएट महत्त्वाचाच आहे. तुम्ही प्रॉपर न्यूट्रिशियन फूड घ्या किंवा थोडं फॅटी फूड घ्या तुमच्या आरोग्याप्रमाणे. नुसता व्यायाम न करता डाएटकडे लक्ष देणे गरजेचे आहे.  

बास्केटबॉल म्हणजे दिसणं, आरोग्य की स्पर्धा? : आरोग्य. खरं तर बास्केटबॉल असा आहे की, मनशांती मिळते. तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असाल, पण मानसिक शांती नसेल तर ते चेहर्‍यावर दिसून येते, पण जेव्हा एखादे आवडीचे काम करताय, ज्यात तुमचे मन रमतेय ते तुमच्यासाठी कधीही आरोग्यदायीच असणार आहे.  

दिवसातून पाणी किती प्यावे? : तीन ते चार लिटर पाणी पिते. सगळ्यांनी भरपूर पाणी प्यावे. पाण्यामुळे अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. त्वचेसाठीही चांगले असते.  

व्यायामाला किती वेळ देता? : मी व्यायामासाठी दिवसातले दहा तास देत असते. सकाळी व्यायाम करते, दुपारी एका शाळेत शिकवायला जाते. तिथे मुलांसोबत मीही व्यायाम करते. संध्याकाळी सरावादरम्यान व्यायाम होतो.  

जिमला जायला मिळाल्यास? : घरच्या घरी व्यायाम करते. घरी डंबेल्स आहेत, बार आहे. घरी व्यायामाचे साहित्य आहे. त्यामुळे जिमला गेले नाही तर घरच्या घरी व्यायाम करते.  

बाहेर गेल्यावर डाएट कसा सांभाळता? : फळं खाते, जी बाहेर सगळीकडे मिळतात आणि ती शरीरासाठी हानीकारक नसतात. फळं, खजूर, अमुल कूल पिते, पाणी भरपूर पिते.  

कोणता पदार्थ नियमित खातेस? : कडधान्ये, चीज, खजूर. ज्यामध्ये प्रोटिन  न्यूट्रिशन जास्त आहेत असे पदार्थ खाते.  

फिटनेससाठी कोणत्या गोष्टीचा त्याग केलास? : नाही.  

फिटनेसबाबत अपडेट करण्यासाठी? : मी रेल्वेत आहे आणि आम्ही सातत्याने मोठमोठ्या खेळाडूंच्या सान्निध्यात असतो. फिजिकल ट्रेनरच्या सान्निध्यात असतो आणि मी एक एनआयएस कोर्स केला आहे. त्यात तुम्हाला सगळी माहिती मिळते आणि त्यातून अपडेट राहत असते.  

फिटनेस मंत्र : पुरेशी झोप, भरपूर पाणी, भरपेट न्याहारी, दुपारचा जेवण आणि रात्री हलका आहार करा. कुठल्याही गोष्टीचा जास्त ताण घेऊ नका.